Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात
Raigad Shivrajyabhishek Sohala 2025 : छत्रपती शिवाजी मराहाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.
किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी मराहाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा याची दही याची डोळा बघण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी काल रात्रीपासून रायगडावर गर्दी केलेली दिसली. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत हा सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन याठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाल्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही गडावर पोहोचले असून देशमुख कुटुंबही रायगडावर जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर होळीच्या माळावर डोळ्यांचे पारणे फेडणारी शिवकालीन मर्दानी आणि युद्ध कलेची युवक युवतींनी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

