Aurangabad : मुख्यमंत्री संभाजीनगर म्हणतात, त्यांना आनंद असेल तर म्हणू देत…टोपे नेमकं काय म्हणालेत?
राज्यात इतरही अनेक प्रश्न आहेत. पाणी, रस्ते, वीजेकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत. त्यामुळे पक्षाचा आणि सरकारचाही हा अजेंडा नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सुरु आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी नुकतंच यावरून शिवसेनेला (Shiv Sena) डिवचलं. तुम्ही आधी विधानसभेत ठराव मंजूर करून घ्या, केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, मग आम्ही लवकरात लवकर शहराचं नाव बदलून संभाजीनगर करू, असं डॉ. कराड म्हणाले. औरंगाबादेत एका कार्यक्रमासाठी आले असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजीनगरच्या अजेंड्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, हा विषय सरकारच्या अजेंड्यावरचा नाही. मुख्यमंत्री संभाजीनगर म्हणतात. त्यांना आनंद असेल तर म्हणू देत. काहीही हरकत नाहीत. पण राज्यात इतरही अनेक प्रश्न आहेत. पाणी, रस्ते, वीजेकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत. त्यामुळे पक्षाचा आणि सरकारचाही हा अजेंडा नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

