‘पहलगाम’नंतर पाकिस्तानची मोठी कोंडी अन् चीन धावलं मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं तगडा मिसाईलचा साठा
चीनने पाकिस्तानला 100 हून अधिक PL-15 मिसाईल दिले आहे. यानंतर भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार सुद्धा मानले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकाकी पडलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी होताच चीन पाकिस्तानच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळालंय. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा पाठवण्यात आला आहे. चीनने पाकिस्तानला 100 हून अधिक PL-15 मिसाईल दिले आहेत. चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त PL-15 लॉन्ग रेंज एअर टू एअर हल्ला करु शकणारी (VLRAAM) मिसाइल्स दिली असून PL-15 मिसाईलची कमाल मारा कऱण्याची क्षमता ही 200 किलोमीटर इतकी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील तणाव टोकाला पोहोचला आहे. अशी परिस्थिती असताना पहलगाम हल्ल्यानंतर चीन पाकिस्तानच्या मदतीसाठी सरसावल्याने भारतासाठी ही एक चितेंची बाब बनली आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

