Chitra Wagh : आधी पोरीला हालहाल करून मारलं, अन् आता..; चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत
Chitra Wagh Tweet On Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलेल्या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून हगवणे आणि त्यांच्या वकिलांवर निशाणा साधला आहे.
हगवणे कुटुंबाच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. पोरीला हालहाल करून मारलं आता तिच्या चारित्र्यावर बोलत आहात, असे युक्तिवाद करून काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. वैष्णवीचे मारेकरी फासावरच लटकायला हवेत, असंही त्यांनी म्हंटलं आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये चित्र वाघ यांनी लिहिलं आहे की, खवीसाला कसे सगळे खवीस मिळत जातात. तसंच हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे आहेत. पोरीला हालहाल करून मारून टाकलं. पण अजून मन भरलं नाही. मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतात. लांडग्याच्या पुढची औलाद आहे तुमची. माणसं नाहीच तुम्ही. पाईपने मारमार मारलं. तरीही असे युक्तिवाद करून काय साध्य करायचं आहे तुम्हाला? पुणे पोलीस.. एक एक पुरावा गोळा करा. वैष्णवीचे हे मारेकरी फासावरच लटकायला हवेत, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

