Jalna News : जालन्यात पडळकरांच्या विरोधात मोर्चा; ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक
Jalna Christian Community Protest : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालन्यात ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले आहेत. ख्रिश्चन समाज बांधवांनी पडळकर यांच्या विरोधात आज जनआक्रोश मोर्चा काढला. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज जालन्यात उमटत आहेत. यावेळी सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरलेले दिसून आले. तसंच गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे. जालना शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला असून या मोर्चाला दलित संघटनांनी ही पाठिंबा दिला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

