जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन केल्याप्रकरणी CJP चे आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांची ही कारवाई झाली असून, त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल.
दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन केल्याप्रकरणी CJP चे आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांना थोड्याच वेळात मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणले जाईल. त्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला होता, परंतु जामिनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अजिंक्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जंतरमंतरवर केवळ भारताचा झेंडा फडकवला आणि भारत माता की जय घोषणा दिली. यावरही पोलिसांनी तानाशाही वृत्तीने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांच्या मते, त्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले असून, सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पाच दिवसांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्याचा आरोप अजिंक्य शिंदे यांनी केला आहे. हे सरकार लोकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
