tv9 Marathi Special Report | अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; स्थायी समिती बैठकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने
अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी घटकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या वादामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी घटकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या वादामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
बैठकीदरम्यान कामांच्या दर्जावरून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आमनेसामने आले. शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपवर मनमानी कारभाराचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी “मनमानी चालू देणार नाही” असा इशाराही त्यांनी सभागृहात दिला.
वाद चिघळत गेल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावले. त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात ‘डबल-ट्रिपल इंजिन सरकार’च्या माध्यमातून विकासाला गती मिळत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जात असताना, स्थानिक पातळीवर मात्र सत्ताधारी घटकांमध्येच अशा प्रकारचे वाद उफाळून येत असल्याचे या घटनेतून दिसून आले. या घटनेमुळे अकोला महापालिकेतील कारभार आणि सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Published on: Apr 14, 2026 10:27 AM
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...

