CM Fadnavis : CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची अधिवशेनात मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. राज्यमंत्र्यांनी लोकसभेत जुन्या आराखड्यावर आधारित उत्तर दिले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन आराखड्यात या भव्य पुतळ्याचा समावेश असून, त्याला अंतिम मंजुरी मिळताच काम सुरू होईल.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. यापूर्वी राज्यमंत्र्यांनी लोकसभेत जुन्या आराखड्याच्या संदर्भात उत्तर दिले होते. मात्र, आता नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा समावेश आहे. या नवीन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सीएसएमटी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य असा पुतळा उभारला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, रेल्वे मंत्र्यांनी त्यांना याबाबत अवगत केले होते की, राज्यमंत्र्यांचे उत्तर जुन्या आराखड्यावर आधारित होते, तर नवीन आराखड्यात पुतळ्याचा समावेश आहे. यामुळे मुंबईच्या ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?

