CM Fadnavis : फडणवीसांच्या हस्ते सायबर जागृती अभियानाचा शुभारंभ, AI चे फायदे अन् दुष्परिणामांवर म्हणाले….
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सायबर सुरक्षितता जागृती अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारीचे वाढते आव्हान आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रात सायबर सुरक्षा जागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेला हा महिनाभर चालणारा उपक्रम सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यांवर प्रकाश टाकतो. आर्थिक फसवणूक, फिशिंग, सायबर बुलिंग, सेक्सटॉर्शन आणि डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जागरूकता आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम सायबर क्राईम सेंटर स्थापन केले असले तरी, गुन्हे घडण्यापूर्वीच नागरिकांना शिक्षित करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यावर भर दिला जाईल. याच कार्यक्रमात फडणवीस यांनी राजकीय भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी संविधानाच्या सामर्थ्यावर विश्वास नसल्याचा आरोप केला आणि त्यांना “सिरीयल लायर” संबोधले.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

