CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे का मानले आभार? फडणवीसांचा तो दावा खरा ठरला अन् हजार रूपये वाचले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नसल्याने आपले १ हजार रुपये वाचल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. त्यांनी आव्हान केले होते की, ठाकरेंच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवणाऱ्यास १ हजार रुपये देणार.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले असून, त्यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नसल्यामुळे आपले एक हजार रुपये वाचल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात विकासाचा एकही मुद्दा नसल्याचे निरीक्षण नोंदवत, फडणवीस यांनी हे विधान केले. फडणवीसांनी एक आव्हान केले होते की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा. मात्र, अख्ख्या भाषणात विकासावर एकही मुद्दा बोलला गेला नाही, असे फडणवीसांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांचे हजार रुपये वाचले.
विकासाच्या मुद्द्यांवर ठाकरे बोलू शकत नाहीत, असेही फडणवीस यांनी नमूद केले. त्यांच्या मते, या भाषणावेळी पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे ते बोलणे एकप्रकारे स्वगत होते. लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसे करणार, राज्याला पुढे कसे नेणार किंवा बीएमसीला (BMC) पुढे कसे नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता, उद्धव ठाकरे यांनी आपले आव्हान खरे करून दाखवले. त्यांच्या या कृतीमुळेच आपले हजार रुपये वाचल्याचे फडणवीस यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील या विधानाने चर्चांना उधाण आले आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

