CM Devendra Fadnavis : एक तालुका, एक बाजार समिती करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
CM Fadnavis In Budget Session : शेत मालाच्या खरेदीत सरकार मागे पडणार नाही. आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड आपण मोडला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी ते सभागृहात बोलत होते.
सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन करणारं मध्यप्रदेश आहे. मध्यप्रदेशात ६ लाख मॅट्रिक टन खरेदी झाली. राजस्थानात ९८ हजार मॅट्रीक टन आहे. गुजरातमध्ये ५४ हजार मॅट्रिक टन आहे. आपली ११ लाख २१ हजार ३८६ मॅट्रीक टन आहे. या सर्व राज्यांची एकत्रित खरेदी पाहिली तर २ लाख ४४ हजार मॅट्रीक टन खरेदी आपल्या राज्याने केली आहे. म्हणजे १२८ टक्के जास्त खरेदी महाराष्ट्राने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी ते सभागृहात भाषण करत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड आपण मोडला आहे. यापूर्वी सर्वाधिक खरेदी २०१६-१७मध्ये केली होती. आता आपण हा रेकॉर्ड मोडला आहे. अर्थात काही लोकांची खरेदी राहिली आहे. त्याबाबत केंद्राला सांगितलं आहे. ही खरेदी झाल्यावर तूर खरेदी करायची होती. पण गोडावून शिल्लक नव्हते. त्यामुळे खाजगी गोडावून भाड्याने खरेदी केली आणि तूर खरेदी केली. १३७ लाख क्विंटल एफएक्यू प्रतिचा कापूस आपण खरेदी केला आहे. ५० हजार क्विंटलच्यावर ज्या ठिकाणी कापसू आहे, तिथे नवीन केंद्र देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे अधिकची केंद्रे देणार आहे.
हमी भावाने आपण तूर खरेदी करत आहोत. ७ हजार ५५० इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला. तो मागील वर्षापेक्षा ५५० रुपये जास्त आहे. यात लागवडी खालचं क्षेत्र १२.१० लाख हेक्टर आहे. ११ लाख टन आपलं उत्पादन आहे. खरेदी करत आहोत त्यात २ लाख ९७ हजार ४३० मॅट्रिक टनाचं पहिलं टार्गेट आहे. त्याची नोंदणी झाली आहे. ती खरदी सुरू आहे. एक तालुका एक बाजार समिती आपण करणार आहोत. शेत मालाच्या खरेदीत सरकार मागे पडणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
