CM Devendra Fadnavis : मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमधून फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
CM Devendra Fadnavis In TV9 Marathi Conclave : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या रंजीनामयाबद्दल देखील भाष्य केलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी मंत्र्यांच्या जवळचा असल्याने नैतिकतेतून धनंजय मुंडे यांचा राजीनामा गरजेचं होता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हे उत्तर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमधून या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला की चुकीच्यावेळी झाला या चर्चेत मी जात नाही. राजकारणात पहिला दिवस असो की शेवटचा दिवस लोकांना बोलायचं ते बोलतात. फोटो आले, हत्या ज्या प्रकारची झाली आहे आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं गेलं, तो मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे, तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होता. पण फर्मली आम्ही डील केलं आणि त्यांनी राजीनामा दिला, असं यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
