CM Devendra Fadnavis : एकसंघ भारताचं श्रेय बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाचं; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
CM Devendra Fadnavis In Chaityabhoomi : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशाच्या विकासात संविधानाचा मोलाचा वाटा आहे. आज एकसंघ भारत आपण बघतो आहे याचं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जातं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती उत्साहात साजरी होते आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चैत्यभूमीवर भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केलं. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे राष्ट्रपुरुष होते. त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. त्यांचे कार्य अतुलनीय होते. देशाच्या विकासात संविधानाच मोलाचा वाटा आहे. संविधानामुळेच प्रत्येकाला समान अधिकार मिळाला असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हंटलं.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

