“आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत हात मिळवला तरी काहीजण घाबरले”, मुख्यमंत्री शिंदे यांचा मविआला टोला
आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचं कौतुक केलं.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “”विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक आहेत. आक्रमक, बेधडक, झोकून देऊन काम करणारे नेते आहेत. गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयात नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं. विदर्भात शिवसेना वाढवण्याच काम त्यांनी केलं. बाळासाहेबांचा मूलमंत्र होता, 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही कायम ठेवलं.विजय वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत.ते रस्त्यावर येऊन उतरून काम करणारे नेते आहेत.”
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

