एमपीएससीच्या आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन; म्हणाले “मी विनंती करतो…”
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं कालपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. पुढे काय झालं? पाहा...
पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं कालपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. फोनवरून विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधला. आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विनंती केली आहे. मी पुन्हा आयोगाशी चर्चा करणार आहे. आंदोलन तुर्तास मागे घ्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. माञ विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली 2025 पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.हे आंदोलन कालपासून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

