Maharashtra Politics : असमाधानी! मिळालेल्या खात्यांबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी?

ग्रामीण भागाशी संबंधित खातं मिळावं, यासाठी शिंदे गटातील काही जण आग्रही असल्याचं कळतंय. ग्रामविकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे गटातील काही मंत्री इच्छुक...

Maharashtra Politics : असमाधानी! मिळालेल्या खात्यांबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी?
| Updated on: Sep 23, 2022 | 9:35 AM

मुंबई : शिवसेनेतून (Shiv sena) बंडखोरी करुन भाजपसोबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde- Devendra Fadnavis Government) यांनी सरकार स्थापन केलं. बरेच दिवस मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तारही लांबला होता. पण आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दोन-अडीच महिनेच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची काळजी वाढवणारी बातमी समोर आलीय. शिंदे गटाती काही मंत्री हे खात्याबाबत असमाधानी असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागाशी संबंधित खातं मिळावं, यासाठी शिंदे गटातील काही जण आग्रही असल्याचं कळतंय. ग्रामविकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे गटातील काही मंत्री इच्छुक आहेत. या खात्यासाठी शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची कुजबूज ऐकायला मिळतेय. सध्या सार्वजनिक बांधकाम खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तर ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती अनुक्रमे गिरीष महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. दरम्यान, आता सुरु असलेल्या चर्चांमुळे मंत्रिमंडळ विस्तार केला जातो का आणि खातेवाटपताही काही बदल होतो का, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने आता काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

Follow us
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.