सावित्रीबाई फुले आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
VIDEO | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या 'त्या' मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय
मुंबई : सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी आज राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती. नेते छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांनी एकत्र रस्त्यावर उतरत राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी असं म्हटले की, ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्तीच्या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण करण्यात आलेलं आहे. या लेखातील भाषा अतिशय अपमानजनक आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, छगन भुजबळ यांनी लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

