Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवरायांची शपथ अन् मराठ्यांना शब्द, कुणाचंही काढून न घेता…
VIDEO | आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत भर मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला आश्वस्त केलं आणि म्हणाले, कुणाचंही काढून न घेता टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देणार
मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षण द्यावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मनोज जरांगे यांनी दिलेली ही मुदत कालच संपली आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मंचावर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आणि शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचा शब्द मराठा समाजाला दिला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘कुणावरही अन्याय न करता आणि कुणाचं आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. एकनाथ शिंदे असेपर्यंत इतर कुणावरही अन्याय न करता मराठा समाजासाठी लढणार.’
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

