मुंडेंचा राजीनामा तरी विरोधकांकडून घेराव सुरूच, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी माहितीच दिलीच नाही!
धनंजय मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं. मात्र विधानसभेत घोषणा का झाली नाही यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय.
मंत्री धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी चार मार्च रोजीच राजीनामा घेतला आणि अधिवेशनातल्या मिडीया स्टँडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी घोषणाही केली. मात्र अद्याप विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी माहितीच दिली नाही. हा विधानसभेचा अवमान असल्याचं नाना पटोले म्हणाले. तर नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी अशी माहिती सभागृहात देण्याची पद्धत नाही असं उत्तर दिलं आणि त्यानंतर पुन्हा जयंत पाटील आक्रमक झाले. तालिका अध्यक्षांना अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला करून द्या असं वारंवार विरोधक सांगत राहिले. मात्र तशी पद्धत नसल्याचं तालिका अध्यक्ष सांगत होते. अखेर तपासून निर्णय देतो अशी घोषणा तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी केली. संजय केळकरांच्या या घोषणेनंतर पटोले जयंत पाटील आणि आव्हाड शांत झाले आणि पुढचं कामकाज सुरु झालं. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रात्री पंकजा मुंडेंनी त्यांची भेट घेतली पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या सरकारी सातपुडा बंगल्यावर आल्या. तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हंटलं होतं तेच तब्येतीचं कारण पंकजा मुंडेंनी भेटीसाठी दिलं तब्येतीच्या कारणास्तव भेट झाली बाकी कुठलंही कारण नाही अशी माहिती पंकजा मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आली.