CM Fadanvis : मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले, गणेशोत्सवात विघ्न नको तर एकनाथ शिंदे म्हणाले..
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. सरकारकडून ५५ लाख नोंदींची अंमलबजावणी न झाल्याने हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाज २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील एका सभेत यांची मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी मुंबईत निघणाऱ्या मोर्चासाठी मराठी बांधव २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून प्रस्थान करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर ५५ लाख नोंदींची अंमलबजावणी न करण्याचा आरोपही केला आहे. दरम्यान मुंबईतील आझाद मैदान येथे धडकणाऱ्या मोर्चासाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे सांगितले तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना हा मोर्चा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. इतकंच नाही तर कोणत्याही हिंसाचारापासून दूर राहण्यासही सांगितले आहे.
दरम्यान या मोर्चाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मागणी करत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे पण गणेशोत्सवात विघ्न नको, असं स्पष्टत भाष्य केले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती काळात होणाऱ्या आंदोलनावर पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

