Ladki Bahin Yojana : महिलांनो… अटी केल्या कमी, आता फक्त ‘हीच’ कागदपत्रं आवश्यक; ‘या’ तारखेच्या आत करा अर्ज
लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी १५ दिवसांऐवजी २ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. या दोन महिन्यात कधीही अर्ज केला तरी पैसे पूर्ण दोन महिन्यांचे मिळणार आहेत. म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळणार
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी १ जुलैपासूनच महिलांची तहसील आणि सेतू कार्यालयात मोठी गर्दी होतांना दिसत आहे. महिलांची ही गर्दी लक्षात घेता सरकारकडून या योजनेच्या अटी शिथिल केल्यात. इतकंच नाहीतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी १५ दिवसांऐवजी २ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. या दोन महिन्यात कधीही अर्ज केला तरी पैसे पूर्ण दोन महिन्यांचे मिळणार आहेत. म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळतील. या योजनेकरता आवश्यक असणाऱ्या डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल केली तरीही महिलांची धावाधाव सुरूच आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा महिलांची मोठी गर्दी होतेय. ही वाढती गर्दी लक्षात घेता सरकारने कालावधी वाढवण्याचा आणि अटी शिथिल कऱण्याचा निर्णय घेतला. तर आता फक्त हीच कागदपत्र लागणार…
Published on: Jul 04, 2024 10:57 AM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
