‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र? ‘ही’ मोठी अट, तरच मिळणार लाभ
'महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल', अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी घोषणा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेद्वारे महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार पण अटी आणि शर्तींमुळे कमी महिलांना फायदा मिळणार असा आरोप विरोधकांनी केला. महायुतीच्या सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा कऱण्यात आली. इतकंच नाहीतर पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये देण्यात येणार यासंदर्भातील जीआर देखील काढला. पण त्या योजनेतील अटी आणि शर्थींमुळे केवळ 22 टक्के महिलांनाच या योजनेचा फायदा होईल, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. “महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. आता नेमकं कोण पात्र आणि अपात्र बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट?
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
