Nana Patole |मुख्यमंत्र्यांना जोक करायची सवय, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील भाषणानंतर राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत माध्यमांनी काँग्रेस नेते नाना पटोल यांच्याशी बातचित केली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवे यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत माध्यमांनी काँग्रेस नेते नाना पटोल यांच्याशी बातचित केली. यावेळी पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय आहे. भाजप सध्या तणावात आहे, म्हणून त्यांच्या समाधानासाठी मुख्यमंत्री बोलले असतील. ते कोणत्या अर्थानं बोलले हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतील. तसेच पटोले म्हणाले की, आम्ही सत्तेत बसताना आनंदाने आलोय, असं कधी बोललो नाही, केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं म्हणून आम्ही सत्तेत आहोत. आमची 2014 साठी तयारी सुरु आहे. त्यासाठी आमचं काम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI