विनायक राऊतांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे रत्नागिरीतील शिवसैनिक अस्वस्थ; थेट आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार
विनायक राऊतांच्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राजापूरचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी याबाबत थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे.
रत्नागिरी : धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला 90 टक्के स्थानिकांचा विरोध आहे, असं वक्तव्य शिवसेना (shiv sena) खासदार विनायक ( Vinayak Raut) राऊत यांनी केलं होतं. विनायक राऊतांच्या या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राजापूरचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी याबाबत थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला 90 टक्के स्थानिकांचा विरोध आहे, असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. मात्र राऊत यांचं हे वक्तव्य चुकीचे असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. संतोष चव्हाण यांच्या या तक्रारीनंतर आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालच आदित्य ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतल्याचे पहायला मिळाले.
Published on: Sep 17, 2022 12:59 PM
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले

