इंडिया आघाडीतील काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित? ‘या’ ९ राज्यात काँग्रेस एकत्र लढणार
९ राज्यात काँग्रेस मित्र पक्षांसोबत एकत्र लढणार आहे. तर इतर ठिकाणी स्वतंत्र लढण्याचं प्लान काँग्रेसचा आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. काँग्रेस महाराष्ट्रात ठाकरे गट, शरद पवार गटासोबत एकत्र लढणार आहे.
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : विरोधकांच्या इंडिया आघाडीचं लवकरच जागा वाटप होणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ राज्यात काँग्रेस मित्र पक्षांसोबत एकत्र लढणार आहे. तर इतर ठिकाणी स्वतंत्र लढण्याचं प्लान काँग्रेसचा आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. काँग्रेस महाराष्ट्रात ठाकरे गट, शरद पवार गटासोबत एकत्र लढणार आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीसोबत एकत्र लढणार, तमिळनाडूत एम.के स्टॅलिन यांच्या डीएमकेसोबत काँग्रेस मैदानात असेल, बिहारमध्ये नितीश कुमारांची जेडीयू, लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीसोबत एकत्र लढणार, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चासोबत काँग्रेस भाजपशी दोन हात करणार आहे तर केरळात भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस उतरणार आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

