Parliament : ‘मुद्दा संख्यात्मकांचा नसून मणिपूरला न्याय देण्याचा’; काँग्रेस नेत्यानं भर संसदेतच सुनावलं
यावेळी मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. तर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजपसह एनडीएच्या नेत्यांनी सभागृहात जोरदार हंगामा केला.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 । आज मंगळवार लोकसभेत केंद्र सरकारवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. तर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजपसह एनडीएच्या नेत्यांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. यानंतर गोगोई यांनी, मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांचे मौन का असा सवाल केला. तर त्यांचे मौन तोडण्यासाठी हा हा ठराव आणला असा घणाघात केला. तर या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे ही आमची मजबुरी असल्याचे देखील त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर मुद्दा संख्यात्मक ताकदीचा नसून मणिपूरला न्याय देण्यासाठी आहे. यावेळी त्यांनी संसदीय मंत्र्यांवरही बोट ठेवत टीका केली.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

