Rahul Gandhi : UQ, JJW ही मतदारांची नावं! अशी होते व्होट चोरी, राहुल गांधींकडून पुरावे देत पोलखोल
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकीतील मतदानात मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे आरोप केले आहेत. कर्नाटकातील आलंद मतदारसंघात 6018 मतं डिलिट केली गेली, तर राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाढवण्यात आली. काँग्रेसच्या विजयी बूथवरून मतं कमी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकीतील मतदानाच्या प्रक्रियेत गडबड झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या मते, कर्नाटकातील आलंद मतदारसंघात काँग्रेसने जिंकलेल्या 8 बूथमधील 6 हजार 018 मतं डिलिट करण्यात आली. तसेच, महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मतं अनाधिकृतपणे वाढवण्यात आली. राहुल गांधी यांनी असा दावा केला आहे की, हा डेटा सॉफ्टवेअरच्या मदतीने बदलण्यात आला आणि कर्नाटकच्या बाहेरून नंबर वापरून खोट्या माहितीने हे बदल करण्यात आले. कर्नाटक सीआयडीने याबाबत 18 महिन्यात 18 पत्रे निवडणूक आयोगाला पाठवली आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला एका आठवड्यात यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

