Rahul Gandhi Video : ‘हा निवडणूक आयोगाचा खेळ… इतके मतदार कसे वाढले?’, राहुल गांधींचा थेट सवाल
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आम्ही सविस्तर अभ्यास केलाय, तिथे हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्रातील मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली, अनियमितता आढळून आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप विरोध सातत्याने करताय. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून आजची पत्रकार परिषद होती. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्र निवडणुकीतील आम्हाला काही माहिती मिळाली आहे. आम्ही अभ्यास केला. मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली. तरुण मुलं मुली लोकशाहीवर विश्वास ठेवतात. सरकारने निवडणुकीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्यात चीफ जस्टीस असायचे. त्यांना काढून भाजपच्या माणसाला घेतले. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त बदलले. विधानसभेत २०१९ आणि लोकसभा २०२४ मध्ये ३२ लाख मतदार मतदार अॅड झाले आणि पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले. पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. ही लोकं कोण आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला. तर या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येएवढे मतदार वाढले. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले? महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख आहे. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. तर विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे? असंही राहुल गांधींनी म्हटलं.

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी

मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल

फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं

'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
