Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, बिना तर्काचं किंवा बिना बुद्धीचं…
यादरम्यान आता आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीस सावरकर यांच्यावर वक्तव्य केल्यापासून राज्यातलं राजकारण तापलेलं आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाला असताना महाविकास आघाडीमध्ये यावरून मतभेद निर्माण होताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राहुल गांधी यांच्यात भेट होणार आहे. यादरम्यान आता आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरून पुन्हा राज्यात भाजप आक्रमक होताना दिसत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची अशी खोचक टीका केली आहे. तर कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जर बिना तर्काचं किंवा बिना बुद्धीचं बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार असेही ते म्हणाले.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

