Mumbai Congress Protest | कारवाई विरोधात मुंबईमध्ये काँग्रेस करणार ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन
कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आझाद मैदानापासून ते बिलार्ड इस्टेट येथे असलेल्या ईडीच्या कार्यालयापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना सुद्धा नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. या ईडीच्या नोटीसा विरोधात काँग्रेस देशभर आक्रमक झालेली आहे. याचे पडसाद मुंबईत सुध्दा दिसून येत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा ईडीच्या कार्यालयावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आज आंदोलन केल जाणार आहे.
आझाद मैदानापासून ते बिलार्ड इस्टेट येथे असलेल्या ईडीच्या कार्यालयापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.या आंदोलनाची जय्यत तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

