COVID-19 Update : देशात कोरोना पसतोय… सर्वाधिक रूग्ण असणारं ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्राची स्थिती काय?
दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक यासारख्या राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत नोंदवली जात असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. देशभरामध्ये तब्बल १ हजार ३०० कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे बाधिक झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरताना दिसतंय. केरळ राज्यात सर्वाधिक ४३० कोरोना रूग्णांची नोंदर आहे तर महाराष्ट्रात ३८३ कोरोना रूग्ण अद्याप सक्रिय असून सात रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. देशात कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरताना दिसत असून आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील काही राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी आणि उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

