AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath च्या एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 8:33 AM
Share

उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधील हिललाईन पोलिस ठाण्याजवळ गोल्डन पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत तळमजल्यावर कुमार श्यामदासानी हे वास्तव्याला आहेत. बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कुमार यांना त्यांच्या बेडरूममध्ये एक साप असल्याचं आढळलं. त्यामुळे घाबरलेल्या कुमार यांनी थेट त्यांचे नगरसेवक भरत गंगोत्री यांना फोन करून मदतीसाठी पाचारण केलं. भरत गंगोत्री यांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली, मात्र दरम्यानच्या काळात अग्निशमन दल किंवा सर्पमित्रांची वाट न पाहता गंगोत्री यांनी स्वतः जाऊन हा साप पकडला.

उल्हासनगरमध्ये एका नागरिकाच्या घरी साप घुसल्यानंतर संबंधित नागरिकाने थेट नगरसेवकालाच फोन केला. यानंतर या नागरिकाच्या घरी दाखल झालेल्या नगरसेवकाने कोणतंही प्रशिक्षण नसताना सापाला पकडलं. भरत गंगोत्री असं या नगरसेवकाचं नाव असून त्यांच्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे.