TV9 Corporate Badminton Championship Season 2 : TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
बॅडमिंटनप्रेमी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंना ही एक सुवर्णसंधी आहे! ‘कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 1’ च्या अभूतपूर्व यशानंतर आता TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2 सुरू होण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
बॅडमिंटनप्रेमी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2’ लवकरच सुरू होणार असून, या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यंदाच्या स्पर्धेबाबत उत्सुकता वाढली आहे.
ही स्पर्धा 15 ते 17 मे 2026 दरम्यान हैदराबादमधील Pullela Gopichand Badminton Academy येथे पार पडणार आहे. TV9 नेटवर्ककडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडूंना घडवणाऱ्या प्रतिष्ठित अकॅडमीत खेळण्याची संधी सहभागी खेळाडूंना मिळणार आहे. तसेच, विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी यांना क्रीडेमार्फत एकत्र येत नेटवर्किंग करण्याचीही संधी मिळणार आहे.
यंदा स्पर्धा अधिक व्यावसायिक पद्धतीने आयोजित केली जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवी अंपायर्सच्या उपस्थितीत सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.