मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई कायद्याला नाचवते, ‘सामना’मधून खोचक टोला

अजय देशपांडे

|

Updated on: Sep 29, 2022 | 8:45 AM

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा घणाघाती टीका करण्यात आली आहे.  'मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई कायद्याला नाचवत असल्याचा टोला लगावला आहे.

शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून (Samana) भाजप (BJP) आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा घणाघाती टीका करण्यात आली आहे.  ‘मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई कायद्याला नाचवत आहे. सर्व घटनात्मक संस्था कमळाबाईनं आपल्या पदरी खोचल्या आहेत. घटनात्मक संस्था पदरी खोचून मिंधे गटाला दिलासे दिले जात आहेत. आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली आहे. सत्तापक्ष म्हणून मिळालेल्या अधिकारांचा अनिर्बंध  वापर करून राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे बनिण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात अराजक माजवणारे कितीही मस्तवाल झाले तरी आम्ही निश्चित आहोत’, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. आता या टीकेला शिंदे गट आणि भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI