आधी गोळीबार अन् स्वतःवरही झाडल्या गोळ्या, अखेर अभिषेक घोसाळकर अन् मॉरिसभाई दोघांचा मृत्यू
अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला.
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:ला देखील चार गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं.यामध्ये त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांनी संवाद साधला. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ते उठले अन् तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

