Ambadas Danve : ‘काड्या करणं बंद करा…’, ‘त्या’ एका प्रश्नावरून अंबादास दानवे पत्रकारांवरच भडकले
'लबाडांनो पाणी द्या' या आंदोलनाची माहिती देण्यासाठी अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी दानवे पत्रकारांवर भडकल्याचे दिसले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद सुरू होती. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे हे पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी एक सवाल केला अन् अंबादास दानवे यांचा डोक्याचा पारा वाढला. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील सुरू असलेल्या वादावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांकडून एक सवाल करण्यात आला. ‘चंद्रकांत खैरे पत्रकार परिषदेत का नाही?’, असं पत्रकारांकडून विचारण्यात आलं. यावर बोलताना अंबादास दानवे भडकले आणि कॅमेऱ्यासमोरच म्हणाले, ‘पत्रकारांनी काड्या करू नये, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत या वादावर सविस्तर चर्चा होऊन ते मिटले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी आमच्या पक्षात लुडबुड करू नये, आमच्यातील वाद मिटवायला आम्ही सक्षम आहोत.’ इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले, तुम्ही तुमचे काम करा. आंदोलनाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा, नाहीतर छापू नका, अशा शब्दात दानवे यांनी पत्रकारांना चांगलंच फटकारल्याचे दिसून आले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

