Sanjay Shirsat : ‘ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत…’, शिवसेनेच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा संजय राऊत यांच्याकडून बनावट असा उल्लेख कऱण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबायचं काही नाव नाही. अमित शाह यांनी बनावट शिवसेना निर्माण करून काहींना चालवायला दिली आहे, असं म्हणत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत आहे का ते बघा?’, असा खोचक सवाल करत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या सेनेसह संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवलाय.
‘बाळासाहेबांच्या नावाने अमित शाह यांनी एक बनावट शिवसेना तयार केली आहे. ही बनावट शिवसेना महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली आहे.’, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी जिव्हारी लागणारं भाष्य केलं. ‘तुमचा पक्ष आहे कुठे… जरा सिल्व्हर ओकच्या आजूबाजूला जाऊन एकदा बघा तिथल्या कचराकुंडीच तर नाही ना.. किंवा राहुल गांधींच्या बेडरूममध्ये तर नाही ना.. एकदा बघा तपासून पक्ष कुठू आहे?’, असा सवाल करत संजय शिरसाटांनी जिव्हारी लागणारी टीका केल्याचे पाहायला मिळाले.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

