AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचा 'हा' नेता म्हणतो, सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आनंदासाठी मी गोट्याही खेळेन

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो, “सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आनंदासाठी मी गोट्याही खेळेन”

| Updated on: May 28, 2023 | 10:04 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे हे नेहमीच कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव वेगवेगळ्या समारंभात नाचत असतात, गाण्यावर ठेका धरत असतात, या त्यांच्या कृतीवर त्यांचे विरोधक नेहमीच त्यांच्यावर टीका करत करतात. याच टीकेला उत्तर देत असताना भरणे म्हणाले की, "सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आनंदासाठी नाचणं काय मी गोट्याही खेळेल".

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे हे नेहमीच कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव वेगवेगळ्या समारंभात नाचत असतात, गाण्यावर ठेका धरत असतात, या त्यांच्या कृतीवर त्यांचे विरोधक नेहमीच त्यांच्यावर टीका करत करतात. याच टीकेला उत्तर देत असताना भरणे म्हणाले की, “सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आनंदासाठी नाचणं काय मी गोट्याही खेळेल”. भरणे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत आमदार भरणे यांच्या या वक्तव्याला प्रतिसाद दिला. तसेच “मी आजपर्यंत शासनाचा बॉडीगार्ड किंवा सिक्युरिटी वापरलेली नाही, 2014 साली मी आमदार झालो, त्यावेळी पुण्याच्या एसपी ऑफिसमधून पोलीस बॉडीगार्डसाठी फोन आला होता, त्याच वेळी मी त्यांना सांगितले आहे की, मला बॉडीगार्डची काही गरज नाही, कारण इंदापूर तालुक्याची जनताच हीच माझी बॉडीगार्ड आहे”, असे देखील भरणे म्हणाले.

Published on: May 28, 2023 10:04 AM