Ladki Bahin Yojana : अजित दादांनी विचारलं ‘लाडकी बहीण’ कुणी आणली, महिलेचं भन्नाट उत्तर; म्हणाली…
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु असून नाशिकच्या दिंडोरीमधून ही यात्रा सुरू झाली. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्रभर फिरून जनतेशी संवाद साधत आहे. अशातच आज अमळनेरमध्ये असताना शेतकऱ्यांचा बांधावर थेट अजित पवार पोहोचले.
राज्यात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली अन् त्यानंतर राज्यातील सर्वच महिलांची या योजनेची लाभार्थी होण्यासाठी लगबग सुरू झाली. राज्यातील प्रत्येत काना-कोपऱ्यातून आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. येत्या 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी दोन महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या महिलावर्गात या योजनेची चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, राज्यात दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. यावेळी जळगाव अमळनेरमध्ये अजित दादा शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले आणि त्यांची विचारपूस केली यावेळी दादांनी एका महिलेला लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारला अन् पुढे काय झालं बघा?