संग्राम जगतापांची एक कृती अन् दादांच्या डोक्याला ताप, अजित पवार देणार होते समज पण…
सध्या दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. त्यामुळे अजित पवार मात्र त्यांना समज देणार होते. मात्र संग्राम जगतापांनी या बैठकीला सुद्धा दांडी मारली. अहिल्यानगरमध्ये दिंडी असल्यामुळे बैठकीला जाता आलं नाही असं संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.
संग्राम जगताप सध्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. याबाबत अजित पवारांनी समज देण्यासाठी जगतापांना बोलावलं होतं. मात्र संग्राम जगतापांनी बैठकीला दांडी मारली. संग्राम जगताप हे दादांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार आहेत. दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी मारली असल्याची सूत्रांची माहिती आहे. धर्माबाबत वादग्रस्त विधान करणं पक्षाला परवडणार नाही. संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी दिसून आल. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदारांनी करण पक्षाला परवडणार नाही, असं नेत्यांचं म्हणणं आहे. बघा अजित पवार नेमकं काय म्हणाले?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

