Ajit Pawar : …तर धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिपदी लागणार वर्णी, बघा अजितदादांचं मोठं वक्तव्य काय?
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील कृषी साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याचे आरोप खोडून काढले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अजित पवारांनी केलेले मोठं वक्तव्य बघा
कृषी विभागाच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने क्लिनचीट दिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे संकेत दिलेत. अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान वाल्मिक कराड प्रकरणाशी संबंध न आढळल्यास धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदी संधी देऊ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्याचबरोबर याचिका करता तुषार पडगिलवार याला एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कृषी साहित्य खरेदी बाबत राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

