Ajit Pawar : होय बाबा होय… माझं टक्कल पडलं तरी लोकं मला शिकवतात… दादांच्या मिश्किल वक्तव्याची तुफान चर्चा
शिरूरमधील एका प्रचारसभेत अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केले. माझं टक्कल पडलं तरी लोक मला शिकवतात असे म्हणत त्यांनी राजकीय सल्लागारांवर विनोदी शैलीत टिप्पणी केली. बाबा लोकं अशीच असतात, सगळ्यांचं ऐकावं लागतं, असेही ते म्हणाले.
शिरूरमधील एका प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य करत उपस्थितांना हसण्यास प्रवृत्त केले. माझं टक्कल पडलं तरी लोक मला शिकवतात, असे म्हणत त्यांनी अनुभवाच्या आधारावर सल्ला देणाऱ्यांना टोला लगावला.शिरूरमधील एका प्रचारसभेत बोलण्यासाठी अजित पवार पुढे आले आणि एकाने त्यांना भाषणा संदर्भातील काहीतरी सुचवल्याचे दिसतंय. यावर उत्तर देताना अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले, होय होय होय बाबा होय. आता ही मला शिकवायलाच आलाय. आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार टक्कल न टक्कल पडलंय तरी शिकवते आता काय करू बाबाला. बाबा लोकं अशीच असतात. सगळं बाबा लोकांचंच ऐकावं लागतं, असे अजितदादा म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि मिश्किल टिप्पणी हे दोन्ही प्रकार निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसून येत आहेत.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

