Ajit Pawar : भ्रष्टाचाराचे आका नेमका कोण? अजितदादांचं मोठं विधान अन् पुणे-पिंपरी चिंचवड विकासावरही भाष्य
अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपला लक्ष्य केले. महेश लांडगेंनी केलेल्या पलटवारावर बोलताना पवार म्हणाले, "भ्रष्टाचाराचे आका कोण, हे १५ तारखेला मतदारच ठरवतील." स्थानिक प्रशासनाच्या कामांची जबाबदारी आणि राज्य सरकारच्या भूमिका स्पष्ट करत, विकासाच्या मुद्द्यावर जनतेला निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गैरकारभारावर प्रकाश टाकला. महेश लांडगे यांनी पवारांवरच भ्रष्टाचाराचे आका असल्याचा आरोप केल्यानंतर, अजित पवारांनी याला थेट आव्हान दिले. “भ्रष्टाचाराचे आका कोण, हे मतदारच ठरवतील. जनता जनार्दन लोकशाहीमध्ये सर्वस्व अधिकार हा त्यांचा आहे,” असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी tv9 मराठीला एक मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले.
आपण वैयक्तिक मत मांडण्यापेक्षा अंतिम निर्णय जनतेचाच असेल, यावर त्यांनी भर दिला. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासंदर्भात बोलताना, राज्य सरकारच्या अखत्यारीतील मेट्रो, रिंग रोड आणि पाणी प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, शहरातील कचरा गोळा करणे, नियमित पाणीपुरवठा करणे, वाहतूक समस्या सोडवणे (उदा. रस्ते रुंदीकरण, फ्लायओव्हर) ही कामे स्थानिक कॉर्पोरेशनची असून, ती नीट केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात ही कामे आपण पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....

