Ajit Pawar VIDEO: ‘बोललं की माझं तोंड दिसतं’, अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं, स्वच्छतेवरुन अधिकाऱ्यांवरच भडकले
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी लावण्यात आलेले खिळे आणि अंतर्गत स्वच्छतेवरुन अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलावून चांगलेच झापल्याचे दिसते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जुन्नर तालुक्यात दौरा असून जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र आणि दिवाणी न्यायालयांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी लावण्यात आलेले खिळे आणि अंतर्गत स्वच्छतेवरुन अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलावून चांगलेच झापल्याचे दिसते. ‘मी बोललं की अजित पवार बोलतो असं दिसतं’, अशा शब्दात अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलंच फटकारलं. जुन्नर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उदघाटन समारंभावेळी इमारतीची पहाणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला स्वच्छतेवरुन चांगलेच झापत खडेबोल सुनावले. ‘बारभाई न्यायधीश येणार आहेत. काय स्वच्छता केली? ग्राऊंड स्वच्छ करायला किती वेळ लागला असता? तुम्ही काहीही कारणं सांगत मला पटलेलं नाही. हे काय बरोबर आहे? काय करून ठेवलंय? बोललं की अजित पवारचं तोंड दिसतं’, अशा शब्दात अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

