Ajit Pawar : वेड्याचा बाजार..लाजा वाटत नाही का रे? स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दादांनी झापलं, पण घडलं काय?
काय रे तुम्ही वेड्याचा बाजार... तुम्हाला लाज वाटत नाही कारे? काय हे काय करताय तुम्ही... सगळ्यांनाच शंभर वेळा सांगतो की पिशव्या घेऊन येऊ नका... लोक शिव्या देतात, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच झापल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पाहून कार्यकर्त्यांना चांगलंच धारेवर धरलं. तर प्लास्टिक पिशव्या आणू नका असं म्हणत अजित पवारांनी स्वतः कचरा उचलला. प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा पाहून संतप्त झालेल्या अजित पवार यांनी स्वतः खाली वाकून पिशव्यांचा कचरा उचलला आणि कार्यकर्त्यांना ‘तुम्हाला लाज वाटत नाही का रे?’ अशा शब्दांत खडसावले.
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, ‘मी तुम्हाला शंभर वेळा सांगितले आहे की पिशव्या घेऊन येऊ नका आणि त्या रस्त्यात टाकू नका… लोक शिव्या देतात.’ तर त्यांनी यापुढे प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन केले. अजित पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्या या कृतीचे अनेकजण कौतुक करत आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

