मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती? नव्या सरकारमध्ये शिंदे नाराज की दुसरं काही कारण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. तर दुसरीकडे अजित पवार मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये खूष असल्याचा दावा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या एका महत्त्वाच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीला मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र शिंदेंची अनुपस्थिती अनेकांच्या डोळ्यात भरणारी ठरली. नव्या सरकारमध्ये आधी खातेवाटपावरून वाद झाला. आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी गेले होते. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीला त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. मात्र नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला शिंदे गैरहजर राहिल्याने नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून गैरहजेरीबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं. वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिलेत. रूटीन चेकअपसाठी ते ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात गेले होते, असं शिंदेंच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर संजय राऊत यांनी सामनातून वेगळाच दावा केला. बघा काय म्हणाले संजय राऊत?

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक

'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला

'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा

आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
