‘आमच्याकडे या, आम्ही…’, एकनाथ शिंदे अन् अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ
नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. बघा काय म्हणाले नाना पटोले?
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खुर्च्यांच्या अदलाबदलीसंदर्भात एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. आता या विधानवरुन चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले. यामुळे राजकीय वातावरण तापणार असून महायुतीकडून काय उत्तर मिळणार याकडे आता लक्ष लागून आहे. “तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे”, असे नाना पटोलेंनी म्हटले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
