Bihar Election Results : बिहारचा निकाल जाहीर होताच शिंदे यांचा PM मोदी यांना थेट फोन; म्हणाले हा विजय…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल फोन करून शुभेच्छा दिल्या. शिंदे यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून यशस्वी वाटचाल सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांना मोठा झटका बसला आहे. आरजेडी सर्वात मोठा पक्ष होईल, असे राजकीय पंडितांचे भाकीत होते, परंतु ते चुकीचे ठरले. सर्व विरोधकांच्या महाआघाडीला मिळून 40 जागाही मिळाल्या नाहीत, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान NDA च्या या दणदणीत विजयानंतर काँग्रेसने पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून बिहारमधील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, बिहारमधील विजय हा मोदींच्या नेतृत्वाचाच असल्याचे म्हटले. एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुती भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सर्व ठिकाणी जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

