Eknath Shinde : योगेश तू चिंता करू नको हा एकनाथ…. डान्सबार प्रकरणात कोंडी अन् शिंदेंकडून गृहराज्यमंत्र्यांची पाठराखण
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार प्रकरणात जोरदार टीका होत आहे. डान्स बार प्रकरणात योगेश कदम अडचणीत आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येतेय. डान्स बार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. योगेश चिंता करू नको, मी तुझ्या पाठिशी आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान, मुंबईतल्या डान्सबारवरून योगेश कदम यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. तर याच प्रकरणावरून रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. डान्सबार चालवणाऱ्यांची आमची औलाद नाही तर आम्ही तरूणांना रोजगार देणारे आहोत, असं रामदास कदम यांनी म्हटलंय.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आरोप केला की, मुंबईतील कांदिवली येथील ‘सावली’ नावाच्या डान्स बारचा परवाना योगेश कदम यांच्या मातोश्री (आई) ज्योती कदम यांच्या नावाने आहे. दरम्यान, योगेश कदम स्वतः गृहराज्यमंत्री असताना, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा किंवा त्यांच्या नावाने परवाना असलेला डान्स बार सुरू असणे हे पदाचा गैरवापर असल्याचे म्हणत विरोधकांकडून योगेश कदमांवर टीकास्त्र डागलं जात आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

