रविंद्र धंगेकर यांना मतं कशी आणि का मिळाली? दीपक केसरकर यांनी ‘लॉजिक’ सांगितलं…

kasba peth Assembly Election Result 2023 : कसब्यातील पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  पाहा ते काय म्हणालेत...

रविंद्र धंगेकर यांना मतं कशी आणि का मिळाली? दीपक केसरकर यांनी लॉजिक सांगितलं...
Image Credit source: social media
| Updated on: Mar 02, 2023 | 3:22 PM

मुंबई : कसब्यातील पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मला वाटत मतदारांनी महाविकास आघाडीपेक्षा उमेदवार पाहून मतं दिली गेली आहेत. काल मी टीव्हीवर काही मुलाखती पहिल्या त्यामध्ये रविंद्र धंगेकर या उमेदवारांचे नाव घेत होते. त्यांच्या कामाबद्दल बोलत होते. ते उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी बद्दल किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल बोलत नव्हते, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना लोकांची सहानुभूती मिळाली आहे. त्यांनी लोकांची कामं केली आहेत. ते याआधी पराभूत झाले होते. आता भाजप उमेदवार देताना चुकलं, असं मी म्हणणार नाही धंगेकर यांना लोकांची सहानुभूती मिळाली, असंही केसरकर म्हणालेत.